काय तुमच्या व्यस्त वेळापत्रकातून विश्रांती हवी आहे? आमचे Marathi Kodi with Answer तपासा. मेंदूच्या विश्रांतीसाठी आणि मौजमजेसाठी मराठी कोडी नेहमीच सर्वोत्तम आहेत, मग ते कठीण, सोपे किंवा साधे Marathi Puzzles असू शकतात. एखाद्या व्यक्तीच्या जीवनातील एक मजेदार भाग म्हणून Marathi Kodi नेहमीच सर्वोत्तम राहिल्या आहेत.
त्यात एखाद्या वस्तुंचे नांव कोडी ने ओळखने तर खुपच मजेदार असते. तुमच्या करीता आम्ही 15 असे ओळखा पाहू मी कोण मराठी कोडी उत्तरासह दिलेल्या आहेत. ज्या सोडवतांना तुम्हाला मजा पण येणार आणि तुमच्या मतिष्काची चांगलीच कसरत होणार. तर चला बघु या तुम्ही किती कोडी ओळखू शकता ?
तुम्ही आव्हानासाठी तयार आहात का?

1. बारा जण आहेत जेवायला, एक जण आहे वाढायला, ओळखा पाहू मी कोण ?
2. एक कपिला गायआहेत, तिला लोंखडी पाय, राजा बोंबलत जातो, पण ती थांबत नाही,ओळखा पाहू ती कोण ?
3. आम्ही जुळे भाऊ शेजाशेजारी, तरीही भेटत नाही जन्मोजन्मीआम्ही जुळे भाऊ, ओळखा पाहू आम्ही कोण ?
4. मी नेहमी तिथेच असतो, तुम्ही मला फक्त दिवसाच पाहू शकता, रात्री मी तुम्हाला दिसणारच नाही, सांगा पाहू मी कोण ?
Marathi kodi ad - 1
5. लाल मी आहे पण तो रंग नाही, कृष्ण मी आहे पण देव मी नाही, आड आहे पण पाणी त्यात नाही, वाणी आहे पण दुकान माझं नाही, सांगा पाहू मी कोण ?
6. मी आहे तरी कोण ? तिच्या डोळ्यात बोटे टाकली की माझं तोंड उघडते,
सांगा पाहू मी कोण ?
7. एका काळ्याकुट्ट राजाची, अद्भुत मी राणी, हळूहळू पिणार मी पाणी
सांगा पाहू मी कोण ?
8. हिरव्या घरात लपले एक लाल घर, लाल घरात आहेत खूप लहान मुले, ओळखा पाहू मी कोण?
9. काळ्याभोर रानात एक हत्ती मेला, लोकांनी त्याचा पृष्ठभाग उपसून नेला
सांगा मी कोण ?
Marathi kodi ad - 2
10. कोकणातून आली माझी सखी, तिच्या मानेवर दिली मी बुक्की, तिच्या घरभर पसरल्या लेकी, सांगा पाहू मी कोण ?
11 असे काय आहे ज्याचे नाव घेतल्या-घेतल्या ते अदृश्य होते?
12. तुम्ही मला पाण्यात पाहू शकता, परंतु मी कधीही ओली होत नाही.
ओळखा पाहू मी कोण आहे?
13. मी तरुण असतो तेव्हा मी उंच असतो, मी जेव्हा म्हातारा होतो तेव्हा मी ठेंगणा होतो.
ओळखा पाहू मी कोण आहे?
उत्तर: एक मेणबत्ती / पेन्सिल
Marathi kodi ad - 3
14. लोक मला खाण्यासाठी विकत घेतात, परंतु कधीही मला खात नाही. ओळखा पाहू मी कोण आहे?
15. जेव्हा मी जिवंत असेल तेव्हा सर्व जण गाणं गातात, जेव्हा मी मरते तेव्हा सगळे टाळ्या वाजवतात.
ओळखा पाहू मी कोण आहे?
उत्तर: वाढदिवसाला वापरलेल्या मेणबत्त्या