मराठीतील कोडीच्या या संग्रहातील प्रत्येक मराठी कोडी (Puzzles For Kids in Marathi) एकतर मजेदार आहे किंवा तुमच्या तार्किक विचारांची चाचणी घेते आणि मुले आणि प्रौढ दोघांनाही त्याचा आनंद घेता येईल

1. मी उडू शकतो पण मला पंख नाहीत.
मी रडू शकतो पण मला डोळे नाहीत.
मी जिथे जातो तिथे अंधार माझ्या मागे येतो.
ओळखा पाहू मी कोण आहे?
2. असे काय आहे ज्याचे नाव घेतल्या-घेतल्या ते अदृश्य होते?
3. तुम्ही मला पाण्यात पाहू शकता, परंतु मी कधीही ओली होत नाही.
ओळखा पाहू मी कोण आहे?
4. मी तरुण असतो तेव्हा मी उंच असतो, मी जेव्हा म्हातारा होतो तेव्हा मी ठेंगणा होतो.
ओळखा पाहू मी कोण आहे?
उत्तर: एक मेणबत्ती / पेन्सिल
Marathi kodi ad - 1
5. लोक मला खाण्यासाठी विकत घेतात, परंतु कधीही मला खात नाही. ओळखा पाहू मी कोण आहे?
6. जेव्हा मी जिवंत असेल तेव्हा सर्व जण गाणं गातात, जेव्हा मी मरते तेव्हा सगळे टाळ्या वाजवतात.
ओळखा पाहू मी कोण आहे?
उत्तर: वाढदिवसाला वापरलेल्या मेणबत्त्या
7. माझ्याकडे हृदय आहे, परंतु इतर अवयव नाहीत.
ओळख पाहू मी कोण?
8. गोल आहे पण बॉल नाही,
शेपूट आहे पण प्राणी नाही,
सारी मुले माझी शेपूट धरून खेळतात,
पण तरी सुद्धा मी रडत नाही.
ओळख पाहू मी कोण?
9. चौकीवर बसलेली एक राणी, तिच्या डोक्यावर पाणी?
10. आपण जितके पुढे जातो तेवढे मागे सोडत जातो?
Marathi kodi ad - 2
11. एक महिला तिच्या हॉटेलच्या खोलीत बसली आहे, तेवढ्यात कोणी तरी तिचा दरवाजा ठोठावला, तिने दरवाजा उघडला. तो म्हणाला “अरे मला माफ करा, मी चूक केली आहे, मला वाटले की ही माझी खोली आहे.” त्यानंतर तो कॉरिडॉर मध्ये असलेल्या लिफ्टचा वापर करून खाली गेला. ती महिला परत तिच्या खोलीत गेली आणि फोनवर पोलिसांना त्या माणसाची माहिती दिली. असे संशयास्पद त्या महिलेला त्या पुरुषाबद्दल काय वाटले असेल?
उत्तर: आपण आपल्या स्वत: च्या हॉटेल रूमचा दरवाजा कधीच ठोठावत नाही आणि त्या माणसाने सर्वात प्रथम दरवाजा ठोठावला होता.
12. रविवारी दुपारी श्री पाटील यांचा खून करण्यात आला.
बायको म्हणाली की ती एक पुस्तक वाचत आहे.
बटलर म्हणाला की तो शॉवर घेत होता.
आचारी म्हणाला की तो ब्रेकफास्ट बनवत आहे.
मोलकरीण म्हणाली की ती कपडे धुवत होती,
आणि माळी म्हणाली की मी नारळाची झाडे लावत होतो. तर मग श्री पाटील यांचा खून कोणी केला असेल?
उत्तर: आचारी, कारण श्री पाटील यांना दुपारी मारण्यात आले आणि तरीही आचाऱ्याने असा दावा केला की तो नाश्ता बनवित होता!!
13. आपण जितक्या वेगाने धावता तेवढे ते पकडणे कठीण होत जाते?
14. ब्रेकफास्ट साठी कोणत्या दोन गोष्टी आहेत ज्या तुम्ही खाऊ शकत नाही?
15. असे काय आहे ज्याने मी तुमच्या चेहऱ्यावर हास्य आणू शकते,
ज्याने तुमच्या डोळ्यात अश्रू देखील येऊ शकतात पण,
मी पाहिले जाऊ शकत नाही. ओळख पाहू मी काय आहे?
16. अशी कोणती गोष्ट आहे ज्याला मान आहे पण डोके नाही?
17. असे काय आहे जे कोपऱ्यात राहून जगभर काय प्रवास करते?
उत्तर: पत्रावरील एक शिक्का/Stamp
Marathi kodi ad - 3
18. असे काय आहे जे आपल्याकडे असल्यास तुम्ही इतरांना सांगू इच्छिता पण इतरांना सांगितल्यावर ते आपले रहात नाही?
19. जो माणूस ते निर्माण करतो तो ते वापरत नाही; जो माणूस ते खरेदी करतो त्याला त्याची गरज नसते; जो माणूस त्याचा वापर करतो त्याला ते माहित नसते. ओळखा पाहू मी कशाबद्दल बोलत आहे?
उत्तर: एक ताबूत / A coffin
20. एकदा एका मुलाचे आणि त्याच्या वडिलांचा अपघात होतो, आणि या अपघातात त्या मुलाच्या वडिलांचा मृत्यू होतो. मुलाला त्वरित इस्पितळात दाखल केले जाते. ऑपरेशनसाठी हेड सर्जनला बोलावले जाते, पण मुलगा पाहून डॉक्टर लगेचच सांगतो कि “मी ऑपरेट करू शकत नाही. हा माझा मुलगा आहे.” हे कसे शक्य आहे?
उत्तर: हेड सर्जन मुलाची आई आहे.
21. माझ्याकडे बऱ्याच Keys आहेत
तरीही मी कोणते कुलूप उघडू शकत नाही
सांगा मी आहे कोण
22. असे फळ कोणते
त्याच्या पोटात दात असतात
23. दोन अक्षरात सामावले माझे नाव
मस्तक झाकणे आपले माझे काम
ओळखा पाहू मी आहे कोण
24. मी आहे तरी कोण
तिच्या डोळ्यात बोटे टाकली की
माझं तोंड उघडते
25. पंख नाहीत मला तरीही मी हवेत उडते
हात नसूनही मी तुमच्याशी भांडते
सांगा पाहू मी कोण