आजकाल मोबाइल व इंटरनेट च्या युगात मराठी कोडी खेळण्याचा खेळ खूप कमी झाला आहे. म्हणूनच या लेखातील ओळखा पाहू कोडी मराठी (rare marathi riddles) वाचून आपण आपले मित्र व कुटुंबीयांना प्रश्न करू शकतात आणि पुन्हा एकदा Rare marathi riddles चर्चेत आणू शकतात. तर चला सुरू करूया.

1.कान असून बहिरा
2. ठाकूरला राखी बांधली असती तर
जर बसंतीच्या मावशीने
ठाकूरला राखी बांधली
असती तर,
बसंती आणि ठाकूरचे नाते काय?
उत्तर: जास्त विचार करु नका, ठाकूरला हात नव्हते
3. “माऊ माऊ”!! एकदा पाच मांजरी एका रिक्षेत शिरतात.
रिक्षेवाला म्हणतो,”इतके लोक रिक्षेत नाही मावणार..”
तर त्या मांजरी काय म्हणतील?
4. काट्या कुट्या च्या बांधला भारा, कुठं जातोस ढबूण्या पोरा
5. काळ्या रानात हत्ती मेला, त्याच्या पृष्ठभाग उपसून नेला?
Marathi kodi ad - 1
6. पाणी नाही, पाऊस नाही, तरी रान कसं हिरवं, कात नाही चुना नाही तर तोंड कस रंगल?
7. कूट कूट काडी पोटात नाडी, राम जन्माला हात जोडी कृष्ण जन्माला हात जोडी.
उत्तर: देव्हाऱ्यातील घंटी
8. कोंकणातन आली नार, तिचा पदर हिरवागार, तिच्या काखेला प्वार
9. कोंकणातन आली सखी, तिच्या मनावर दिली बुक्की, तिच्या घरभर लेकरी
10. कोकणातून आला भट, धर कि आपट
11. कड्यांवर काडी सात कांडी, वर समुद्राची अंडी
12. मुकुट याच्या डोक्यावर, जांभळा झगा अंगावर
13. कोकणातून आला रंगूकोळी, त्यानं आणली भिंगू चोळी, शिंपीण म्हणते शिवू कशी, परटिण म्हणते धुवू कशी, अन राणी म्हणते घालू कशी?
Marathi kodi ad - 2
14. असा कोणता फुल आहे ज्यामध्ये ना रंग आहे ना सुगंध आहे?
15. अशी कोणती गोष्ट आहे जी लावायच्या वेळी हिरवी असते आणि लावल्यानंतर लाल होऊन जाते?
16. किस करताना कुठल्या अवयवाला सर्वात
जास्त
त्रास होतो ?
उत्तर: हाताला, खोटं वाटत असेल तर १ किलो गाजर/बटाटे/ सुके खोबरे घेऊन त्याचा किस काढून बघा
17. पेटा-यास इंग्रजीत ‘सुटकेस’ का म्हणतात?
उत्तर: कारण, पेटारा छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुटकेस कामी आला
18. ड्या -: पप्पा आपल आडनाव वाघ असुनही तुम्ही मम्मीला एवढ का घाबरता?
उत्तर: पप्पा-: तुझ्या मम्मीच्या माहेरच आडनाव वाघमारे आहे.
19. आठवड्याच्या सात वारांचे व्यतिरिक्त
अजून तीन दिवसांची नावे सांगा
20. असे काय आहे जे नकळत आपण कुठे ना कुठे सोडून देतो पण ते नेहमी आपल्या सोबतच असते?
Marathi kodi ad - 3
21. असे काय आहे ज्याला आपण कधी उघडत नाही पण नेहमी बंद करतो?
22. तुमच्या कडे असे काय आहे जे जेवढे जास्त असणार तेवढेच तुम्हाला कमी दिसणार?
असे काय आहे जे आपण खूप वेळा खातो तरी सुद्धा आपले पोट भरत नाही?
23. अशी कोणती बॅग आहे जी फक्त ओली केल्यावरच उपयोगी येते?
24. एका भाजीचे नाव सांगा ज्याचा अर्थ म्हणजे आपले पालन पोषण करणे आहे?
25. असे काय आहे जे आपण खूप वेळा खातो तरी सुद्धा आपले पोट भरत नाही?