Who Am I Marathi riddles -- या लेखाच्या माध्यमातून आम्ही खूप सारी नवीन मराठी कोडी घेऊन आलो आहोत.

1. माझे शरीर आहे गोल-गोल,
प्रत्येक स्त्रीचे रूप मी अजून निखारते
मी बनले आहे काचेची,
प्रत्येक रंगात मी भेटते.
सांगा पाहू मी कोण?
2. मी कधीच प्रश्न विचारत नाही परंतु नेहमी उत्तर देते. सांगा पाहू मी कोण?
3. माझ्या डोक्यावर चाकू चा घाव घालून तुम्ही मला मारता आणि मी मेलेले असताना तुमची बाजूला रडता सांगा पाहू मी कोण?
4. मी छिद्रांनी भरलेला आहे, तरीही भरपूर पाणी मी स्वतःमध्ये ठेऊ शकतो. सांगा बघू मी कोण?
Marathi kodi ad - 1
5. मला चार बोटे आणि आहे एक अंगठा, परंतु तरीही मी जिवंत नाही?
6. काय आहे जे पंखांशिवाय सुद्धा उडत जाते?
7. रिंग आहे, परंतु बोट नाही ओळखा पाहू मी कोण?
8. चार पाय आहेत, परंतु चालू शकत नाही ओळख पाहू मी कोण?
9. मी हवेपेक्षा हलका आहे परंतु दहा लाख माणसे मला वर उचलू शकत नाहीत, ओळखा पाहू मी कोण?
Marathi kodi ad - 2
10. लोखंडाला सुद्धा मी खेचू शकतो,
पण रबरासमोर मी हरतो,
ओळखा पाहू मी कोण?
11. जगभर मी फिरतो,
पण जमिनीवर ठेवत नाही पाय,
दिवसभर मी झोपतो आणि रात्री मी जागा राहतो,
रात्र आहे काळोखी माझ्या शिवाय
ओळखा पाहू मी कोण?
12. खरेदी करताना काळा, जाळल्यावर लाल,
फेकल्यावर सफेद
ओळखा पाहू मी कोण?
13. रंग आहे माझा काळा,
उजेडात मी दिसते,
अंधारात मी लपते
ओळखा पाहू मी कोण?
14. अशा एका गोष्टीच नाव सांग जी आपल्या आजूबाजूला असते पण दिसत नाही?
Marathi kodi ad - 3
15. अशी कोणती गोष्ट आहे जी बोलल्यानंतर तुटून जाते?
16. तीन हात व पोट आहे गोल,
गर्मीमध्ये होतो माझा उपयोग
ओळखा पाहू मी कोण?
17. वीस जणांचा शिरच्छेद केला,
न मारला न केला खून
सांगा पाहू या कोड्याचे उत्तर?
18. भांड्यावर भांडी,
मुलगा बापापेक्षा गोरा,
19. नाक माझा मोठा
नाकाने करतो सगळे काम,
सांगा पाहू माझं नाव?
20. कोंबडी देते अंडी, गाय देते दूध,
पण असा कोण आहे जो दूध आणि अंडी दोन्ही देतो?
21. असे काय आहे जे ज्याचं आहे तोच बघू शकतो?
22. असा कोणता दुकानदार आहे जो माल घेतो पण आणि त्याचे पैसे पण घेतो?
23. पाण्यातून होतो माझा जन्म आणि पाण्यातच जातो मी मरून,
जेवणाशी आहे माझं जवळच नातं. ओळखा पाहू मी कोण ?
24. असा कोणता कोट आहे जो आपण खाऊ शकत नाही?
25. अशी कोणती गोष्ट आहे जी कितीही चालली, तरी दमत नाही?